तुझ्या शब्दाला, तुझ्या तळमळीला जास्त वजन यायचे असेल तर तुला तू आहेस त्यापेक्षा मोठं, उंच व्हायला हवं.
काय सांगितलं गेलं हे महत्त्वाचं आहे, पण ते कोणी सांगितलं याला जास्त महत्त्व आहे.
तू काहीही करू शकशील, पण आत्ता नाही. तू तुझ्या आयुष्यात भक्कम उभा हवास. वेळ आल्यास तुला चार पैसे खर्च करता आले पाहिजेत. तरच तुझ्यावर दुसऱ्यांचा विश्वास बसेल. घाव जाणकारीनं घालायला हवा. आंधळेपणानं केलेली वाटचाल ही फरपट ठरते.
मोठा हो, जाणता हो, समर्थ हो. मग आपल्या कार्यात तू निश्चित योगदान करू शकशील.
Comments